नॉमिनी संदर्भात महत्वाची माहिती.
तुम्हाला हे माहित आहे का.?
चालू खातं (Current Account) आणि बचत खातं (Savings Account) यामध्ये नामनिर्देशन (Nomination) असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण:
1. मृत्यूनंतर रक्कम मिळवणं सोपं होतं
खातेदाराच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीला बँक सहज पैसे देते.
नामनिर्देश नसल्यास, कुटुंबीयांना कोर्टाकडून उत्तराधिकारी प्रमाणपत्र (Succession Certificate) घ्यावं लागतं.
2. कौटुंबिक वाद टाळता येतो
पैशांवर कोणाचा हक्क हे स्पष्ट असल्यामुळे भांडणं होत नाहीत.
3. बँकेकडून पैसे लवकर दिले जातात
कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न लावता बँक थेट नामनिर्देशित व्यक्तीला पैसे देते.
4. बँकेला कायदेशीर संरक्षण मिळते
खातेदाराने दिलेल्या निर्देशांप्रमाणे बँक पैसे देते, त्यामुळे बँकेवर जबाबदारी राहत नाही.
5. आर्थिक नियोजनात मदत होते.
आपला पैसा योग्य व्यक्तीकडे जाणार याची खात्री खातेदाराला मिळते.
6. मानसिक शांतता
खातेदार शांतपणे खातं चालवू शकतो, कारण मृत्यूनंतरही पैसा आपल्या माणसांकडे जाईल याची खात्री असते.
टीप: नामनिर्देशित व्यक्ती म्हणजेच कायदेशीर वारस नाही, पण ती व्यक्ती बँकेकडून पैसे घेण्यासाठी अधिकृत असते.
तुमच्या खात्याला जरा नॉमिनेशन केले नसेल तर आजच बँकेत संपर्क साधा 👍👍😊
कॉल-9922127600
स्वप्नील पिंगळे
ब्रांच मॅनेजर
सारस्वत बँक
Comments
Post a Comment